सह्याद्री हिल मॅरेथॉन २०२६

न्या. वै. वि. आठल्ये विद्यामंदिर व ज्यु. कॉलेज, शिपोशी च्या दहावी १९९०/९१ बॅच व माजी विद्यार्थी विचार मंच, शिपोशी यांच्या संयुक्त विद्यमाने "एक धाव- मराठी भाषा, मराठी शाळा आणि पर्यावरणासाठी" या संकल्पनेतून भव्य "सह्याद्री मॅरेथॉन २०२६" स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. 


स्पर्धेचा तपशील खालीलप्रमाणे सादर करीत आहोत:


स्पर्धेचे नाव

सह्याद्री मॅरेथॉन २०२६


स्पर्धेची तारीख,वेळ व ठिकाण:


दिनांक: रविवार, दि. १५ नोव्हेंबर २०२६

वेळ: सकाळी ६:०० वाजता

स्थळ: प्रारंभ -  श्री देव गांगेश्वर मंदिर शिपोशी, ता. लांजा

समाप्ती - श्री देव गांगेश्वर मंदिर, शिपोशी , लांजा

स्पर्धेची फी - 

* २१ किमी - रू १२००/-

* १० किमी - रु ८००/-

* ५ किमी फन रन मॅरेथॉन- रु ४००/- ( कोणतीही स्कीम नाही)

* ⁠२१ व १० किमी करिता ( Earli Bird (१५ ऑगस्ट पर्यंत) आणि ग्रुप स्कीम ( १० लोकांचा समूह)म्हणून स्पर्धेच्या फी मधे २०% सवलत मिळणार आहे. 



वयोगट व गटवारी:


| २१ किमी | १८ वर्षे वरील | पुरुष व महिला - खुला गट |

| १० किमी | १६ वर्षे वरील | मुले व मुली - खुला गट |

| ५ किमी | ९ वर्षे वरील | मुले व मुली व इतर - शालेय गट |


स्पर्धेचे अंतर व मार्ग:


- २१ किमी हाफ मॅरेथॉन: शिपोशी - सालपे - कोचरी- चिंचुरटी- केळवली - शिपोशी -

- ⁠१० किमी चॅलेंजिंग मॅरेथॉन: शिपोशी- सालपे- कोचरी- सालपे- शिपोशी 

- ⁠५ किमी फन मॅरेथॉन: शिपोशी- सालपे घाग दुकान- सालपे बौद्धवाडी-सालपे बौद्धवाडी कमानी- शिपोशी ओझर- बाईंगगाव कमानी- श्री देव गांगेश्वर मंदिर शिपोशी 


वितरित करण्यात येणारी रोख रक्कम व पारितोषिके:


| गट | प्रथम | द्वितीय | तृतीय | 

| २१ किमी पुरुष | ₹१५,०००/- | ₹१०,०००/- | ₹५,०००/- | मेडल + प्रमाणपत्र + टी-शर्ट | 

| २१ किमी महिला | ₹१५,०००/- | ₹१०,०००/- | ₹५,०००/-| मेडल + प्रमाणपत्र + टी-शर्ट | 

| १० किमी मुले | ₹१०,०००/- | ₹५,०००/- | ₹३,०००/- | मेडल + प्रमाणपत्र |

| १० किमी मुली | ₹१०,०००/- | ₹५,०००/- | ₹३,०००/- | मेडल + प्रमाणपत्र |

| *५ किमी फन मॅरेथॉन * | मेडल + प्रमाणपत्र + टी-शर्ट | 

सर्व सहभागींना मेडल व प्रमाणपत्र

अधिक माहितीसाठी येथे click करा


आमच्याकडून करण्यात येणाऱ्या सुविधा

1. सर्व स्पर्धकांचा - अपघात विमा*.

2. मार्गावर प्रत्येक २ किमी अंतरावर पाणी, ORS, वैद्यकीय प्रथमोपचार केंद्र.

3. २ ॲम्बुलन्स, डॉक्टर व प्रशिक्षित कर्मचारी वर्ग.

4. वाहतूक व कायदा सुव्यवस्था यासाठी पोलीस विभागाची परवानगी घेण्यात येईल.

5. तांत्रिक अधिकारी व पंच यांना निवास व्यवस्था व पुरेसा नाशता याची सोय करण्यात येईल.

6. ⁠बाहेर गावातील स्पर्धकांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली जाईल. प्रति स्पर्धक रु ७००/- नोंदणीच्या वेळेस आयोजकांजडे जमा करून घेण्यात येतील.

7. ⁠आयोजक संपर्क :  

* श्री दत्तप्रसाद कोलते - ८४२२०८४९९९

* ⁠श्री दीपक नागवेकर -99227 35500 / 94232 93829

* ⁠श्री अरविंद तरळ - 97676 24034

* ⁠श्री हरेश जाधव - +91 +919764664491 / +91 9404160623